Ad will apear here
Next
भारतरत्न आचार्य विनोबा गाथा
आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार येथील समाधीवर त्यांच्याच हस्ताक्षरात ‘एक दिन जाना है भाई, मेरे जाने के बाद पढत रहो गीताई’, असा मजकूर कोरलेला आहे. विनोबाजींनी गीताईतून जे मार्गदर्शन केले आहे, ते सतीशचंद्र तोडणकर यांनी संपादन स्वरूपात ‘भारतरत्न आचार्य विनोबा गाथा’मधून सादर केले आहे.

आचार्य विनोबांच्या मंगल विचारांनी या गाथेला सुरुवात होते. विनोबांनी भारताचा धर्मविचार सांगताना स्पष्ट केलेला धर्माचा अर्थ, हिंदू धर्म, ऋग्वेद, ईश्वर, मूर्तिपूजेचे रहस्य, उपासना, मंदिरे, वर्ण व्यवस्था, गो-उपासना यात आला आहे. धर्माला धरूनच अध्यात्म, वेद, उपनिषदांचा अभ्यास यांची माहिती दिली आहे.

विनोबाजींनी धुळ्यातील कारागृहात दिलेल्या गीता प्रवचनांचा यात समावेश आहे. महात्मा गांधी यांनी गीतापठणात पत्र लिहून सूचना विचारल्या होत्या. त्याला विनोबाजींनी दिलेले उत्तरही आहे. सप्तशती, शंकराचार्यांचे चिंतन, विष्णुसहस्रनाम, संतांची शिकवण, जगातील सर्व धर्मांचे सार, गांधी-विनोबा दर्शन आदी प्रकरणातून विनोबा भावे यांचे चरित्र, कार्य, लेखन, विचार समजतात.          

       
प्रकाशन : शुभदा पब्लिशिंग हाउस
पृष्ठे : ३१८
मूल्य : ४०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZNGBU
Similar Posts
Be Positive : आजचा सकारात्मक विचार आचार्य विनोबा भावे यांचा ११ सप्टेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा एक विचार...
कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन + सत्यम शिवम सुंदरम कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन आणि सत्यम शिवम सुंदरम या पुस्तकांचा परिचय
दिशादर्शक न्यायमूर्ती आणि सच्चा, समन्वयी कार्यकर्ता अत्यंत महत्त्वपूर्ण निकालांनी भारतीय न्यायव्यवस्थेला दिशा देणारे, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, लेखक चंद्रशेखर धर्माधिकारी (९१) यांचे तीन जानेवारी २०१९ रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास नागपुरातील एका खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. सर्वसामान्यांच्या
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language